Home महाराष्ट्र कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. यावेळी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल.

महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असं  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका- निलेश राणे

“मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी शरद पवारांनी ‘या’ तंत्राचा खुबीने वापर केला”

“हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच- संजय राऊत