Home महाराष्ट्र “स्वातंत्र्यसारख्या विषयावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही”

“स्वातंत्र्यसारख्या विषयावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही”

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही संताप व्यक्त करत कंगना रनौतवर टीका केली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

कंगना रनौत या बाईची स्वातंत्र्यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का? हे आधी तिने तपासावे, असं म्हणत राजू शेट्टी  यांनी म्हटलं आहे. यावेळी ते बुलडाण्यातील चिखली येथे आले असताना बोलत होते.

“भगतसिंगांपासून नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याचबरोबर, स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनीदेखील देश एक केला आणि कंगना रनौतसारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे, म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे.” असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य

साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी