“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

0
197

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगामध्ये गेले आहेत. संजय राऊत येण्याच्या आधीच संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडलं गेलं. त्यानंतर देखील संजय राऊत यांनी सभा घेत त्यांनी कन्नडिगांना धारेवर धरलं.

महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, शिवाजी महाराज नसते तर, पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, असं म्हणत संज राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

देवेंद्र फडणवीस 5 वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांचा सवाल

ज्याचं जळतं त्यालाच कळतं, लोकांच्या डोळ्यातील अश्रूंवर राजकारण करू नका; नाना पटोलेंचं फडणवीसांना खडेबोल

ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं; शंभुराज देसाईंचा गोपीचंद पडळकरांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here