सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र त्यातील अजून काहीच मिळालं नाही. शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पॅकेज आहे. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या अपेक्षा आहेत., असं जयंत पाटील म्हणाले. ते विटा (जि.सांगली) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, आजही केंद्र सरकारकडून फूल ना फुलाची पाकळी येईल असं आम्हांला वाटत होतं, पण अजून काहीही आलेलं नाही. ही मदत कधी मिळेल याच्या प्रतिक्षेत आहोत. तसेच केंद्र सरकारकडून जीएसटीची रक्कम जाहीर झाली आहे. पण प्रत्यक्षात जीएसटीची रक्कम येण्यास उशीर होत आहे. बरीच रक्कम प्रलंबित आहे. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“अभिनेता अक्षय कुमारची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”
“भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”
आत्ताची कोरोनाची स्थिती भयानक, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस
“राज्यात विकेंड लाॅकडाऊन जाहीर; पहा असं असेल लाॅकडाऊनचं स्वरूप”