Home नांदेड “भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”

“भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपला धूळ चारत महाविकास आघाडी सरकारने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर झेंडा फडकवला आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीला एकहाती सत्ता मिळाली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चुरस होती. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत बँकेवर सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आत्ताची कोरोनाची स्थिती भयानक, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

“राज्यात विकेंड लाॅकडाऊन जाहीर; पहा असं असेल लाॅकडाऊनचं स्वरूप”

“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड