आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं होतं. त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “दादर हादरलं, धावत्या ट्रेनमधून तरूणीला खाली फेकलं, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात”
हे सगळं बदनाम करण्यासाठी सुरू आहे. यात काही तथ्य नाही. मी स्वतः जयंत पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं मी मुंबईतच होतो. मी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील अनेक नेत्यांशी बोललो. त्यांनीही तेच सांगितलं. त्यामुळे मला विश्वास आहे की जयंत पाटील हे अशा टोळीत जाणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
ते आमच्याबरोबरच राहतील. महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये ते आमच्याबरोबर दिसतील, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. कथित भेटीच्या बातम्या दाखवल्यामुळे जयंत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरे गट-मनसे युती होणार?; उद्धव ठाकरे, लवकरच राज ठाकरेंना फोन करणार?”
मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात
भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, पण…; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य