त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं अशक्य होईल; जयंत पाटलांचा आशिष शेलारांना टोला

0
758

मुंबई : भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती. यावर भाजप ज्यांचा बाप काढतंय त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आशिष शेलारांवर टिकास्त्र सोडलं आहे.

भाजपनं इतकं घसरण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना आशा होती. ती पूर्ण झाली नाही. म्हणून ते चिडले आहेत आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं देखील अशक्य होईल. मात्र इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपनं आत्मचिंतन करावं, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्यासारखे व्हिलन असतील तर त्यांचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेगडेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा- जयंत पाटील

“हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”

“शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here