आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नवव्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी पद सोडल्यानंतर भाजपाने एकच जल्लोष साजरा केला.
मुंबईमध्ये बहुमत चाचणीसाठी आमदार जमलेल्या ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवल्याची दृष्य समोर आली आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंवर रादीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर
दरम्यान, ‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, ‘राज तिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी’, ‘देवेंद्रजी अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देत देवेंद्र फडणवीसांचा जयजयकार भाजपा समर्थकांनी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रानं एक सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं ट्विट
“मोठी बातमी! अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा”
‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण