“जळगावचे सुपुत्र BSF जवान अमित पाटील यांना वीरमरण”

0
339

जळगाव : जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना जळगावचे सुपुत्र आणि बीएसएफचे शूर जवान अमित पाटील यांना वीरमरण आले. अमित पाटील यांच्या निधनामुळे वाकडी गावावर शोककळा पसरली आहे.

अमित पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी होते. सन 2010 मध्ये ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना 8 दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज (बुधवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी, तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला हवा- किरीट सोमय्या

थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय- नितेश राणे

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here