Home महाराष्ट्र प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना...

प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. दृश्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबई महापालिकेत पण जरा कुठं खुट्टं झालं की, लगेच महापालिकेला धारेवर धरलं जात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा मोठा डाव, पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

अजूनही कोविडचं संकट टळलं नाही. कोविड काळात मुंबई महापालिकेनं प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे., असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“NDTV चे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन, वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा सवाल