Home महाराष्ट्र चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालचे स्वप्न भंगताना पाहून खुप वेदना झाल्या- अमोल मिटकरी

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालचे स्वप्न भंगताना पाहून खुप वेदना झाल्या- अमोल मिटकरी

मुंबई : अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (2 मे) जाहीर होत आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तब्बल 207 जागांवर आघाडी मिळवली. तर भाजपला केवळ 81 जागांवर आघाडी मिळाली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प.बंगाल मध्ये आले,मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरून 84 वर जागा आल्या हे राज्यातील भाजपा नेत्यांना बोलायला जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले., असं ट्विट करत मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

अरुण जेटली स्टेडियमवर घोंगावलं पोलार्ड नावाचं वादळ; मुंबईची चेन्नईवर 4 विकेट्सने मात!

“राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनामुळं निधन”