Home देश पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

कोलकाता : अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (2 मे) जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप यापैकी कोण बाजी मारणार, याचा निर्णय होईल.

विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते.  मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसत होती.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस सध्या तब्बल 191 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. तर संयुक्त मोर्चाचे उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार, हे आत्ता तरी दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

अरुण जेटली स्टेडियमवर घोंगावलं पोलार्ड नावाचं वादळ; मुंबईची चेन्नईवर 4 विकेट्सने मात!

“राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनामुळं निधन”

IPL-21! मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय