आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली आहे. तसेच पक्षात काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीच्या माजी आमदारानं आगामी निवडणूकांमध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे.
हे ही वाचा : “बीडमध्ये मनसेचा विजयी झेंडा; नांदूरघाट जिल्हा परिषद गटात मनसेचा उमेदवार बिनविरोध”
राज्य व जिल्हापातळीचा आदेश आपल्याला बंधनकारक असला तरी आघाडी, युतीचा काय निर्णय व्हायचा तो होईल. सध्या तरी स्वबळावर लढायचे आहे, असं गृहीत धरून प्रत्येकाने तयारीला लागा., असं आवाहन राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आयोजित शिबिरात बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करा, तसंच सध्या तरी आपल्याला स्वबळावर लढायचं आहे, असं गृहीत धरून कामाला लागा, असं वाघ यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन सांगून, त्यांचा ‘सह्याद्रीचा वाघ’, असा उल्लेख करत वाघ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील आपण शिवसेनेचं बोट धरून मोठं झालात हे विसरू नका; शंभूराज देसाईंचा इशारा
“अभिनेत्री कंगणा रणाैत पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी”