ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी- रावसाहेब दानवे

0
160

जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही 9 मराठीशी बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. विशेष म्हणजे भाजपपेक्षा हे त्यांच्यासाठी जास्त दुर्दैवं आहे. ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले, त्या पक्षानेच त्यांच्यावर ही पाळी आणली. ते ज्या पक्षात जात आहेत त्याच पक्षाने त्यांचा छळ केला आहे. त्यांनी त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हणत रावसाहेव दानवे यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी थोडं थांबायला हवं होतं. त्यांच्यावर जे आरोप-प्रत्यारोप झाले होते, कोर्टात खटला सुरु होता, ते निपटू द्यायला हवं होतं. मग त्यांना पक्षाने निश्चितच न्याय दिला असता. न्यायालतील खटल्यांचा निकाल न लागता त्यांना न्याय दिला असता तर याच पक्षाने आमच्यावर टीका केली असती, असंही रावसाहेव दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची टीका

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही, त्यांना पश्चाताप होईल”

एकनाथ खडसेंचं जाणं नक्कीच चांगलं नाही- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here