Home महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले

नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले

मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यावरून बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.

जर पोटनिवडणकीत भाजपला पराभूत करून पेट्रोल 5 रुपयाने स्वस्त होत असेल तर पेट्रोल 50 रुपयाने स्वस्त करण्यासाठी संपूर्ण देशात आपल्याला भाजपचा पराभव करावा लागेल आणि 2024 मध्ये ते नक्कीच होईल, अशी टीका राऊतांनी केली होती. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “मनसेकडून शिवसेनेला टाळी, शिवसेनेच्या आवाहनाला मनसेचं समर्थन”

नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवार यांच काम नाही. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला मात्र, केवळ सहानभूतीच्या लाटेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. या यशाने शिवसेनेने भारावून जाऊ नये, असा पलटवार रामदास आठवले यांनी यावेळी केला. ते धुळ्यात माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी – 

समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं; नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

राष्ट्रवादीचे नागपूर मिशन; शिवसेनेतून आलेल्या नेत्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

“मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”