एकनाथ खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंद- गुलाबराव पाटील

0
176

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगावातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ते 30 वर्षे आमदार राहिले आहेत. मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. खडसे भाजपतून गेले, हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा

राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार

दिल्ली कॅपिटल्सचे राजस्थान राॅयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य

 “महाविकास आघाडी सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here