Home महाराष्ट्र माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे

माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगा नुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे., असं ट्विट करत निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडली आहे, मात्र…- शरद पवार

कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील

“भारतीय क्रिकेटर हनुमा विहारीचं भाजप खासदाराला खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाला…”

“पोलिसांनी तातडीने सत्य बाहेर आणलं पाहिजे”