सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं,पण…; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं चॅलेंज

0
370

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.

वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे  यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल करत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिलं आहे.

भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

…पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- देवेंद्र फडणवीस

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, अन्यथा…; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here