मुंबई : लॉकडाऊनच्या काळात येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सरकारने केवळ ‘समज’ दिली असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
हे सरकार आघाडीचे आहे की वाधवान सरकार?, असा सवाल करत या संपूर्ण घटनेची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लॉकडाउनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्यास पास दिलेले अधिकारी अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. मी त्यावेळीही सांगितलं होतं अशा प्रकारचा कोणाताही पास कोणताही अधिकारी आपल्या भरवशावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील प्रमुख लोकं आदेश देत नाहीत तोवर असा पास त्यांना देता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आता ज्या गतीनं त्यांना क्लिनचीट देण्यात आली आणि त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आलं यातून सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्या प्रमुखांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना पास देण्यात आला होता हे स्पष्ट होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हे सरकार आघाडीचे आहे की वाधवान सरकार?
या संपूर्ण घटनेची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, ही आमची मागणी आहे.#CBIEnquiry #WadhwanCase #Maharashtra pic.twitter.com/BsBdsf9wAr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ; हरभजन सिंगचा शाहिद आफ्रिदीला इशारा
लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?
“साईंचं सोनं देशाच्या उपयोगी येत असेल तर भक्तांना आनंद होईल”
…तर काय भलं होणार आपलं; निलेश राणेची राज्य सरकारवर टीका