राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?; ड्रग्स प्रकरणावरून पंकजा मुंडेचा सरकारला सवाल

0
422

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : सध्या राज्यात आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून जोरदार राजकीय युद्ध सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : भाजपाला मोठा धक्का! ‘या’ अभिनेत्रीने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते., असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत होत्या.

दरम्यान, आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपच्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीची साथ; इंदापूरात चर्चेला सुरूवात

“स्टाॅयनिस-वेडची मॅच विनिंग खेळी; पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश”

“स्वातंत्र्यसारख्या विषयावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here