शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार

0
232

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली. भाजप नेते आशिष शेलार यांनीही यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परिषदेला परवानगीच का दिली?,” असा सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शरजील इस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिलं? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचं काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केलं आहे. हे त्यांचं पाप आहे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”

हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले

मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार- सुप्रिया सुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here