Home महाराष्ट्र “सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल

“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबतच सरकारकडून सहकार्य केले जात नाही. उलट सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून आमच्या अधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप सीबीआयने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?” असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस

“डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; चर्चांना उधाण”

अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला

“41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी संघाचं काैतुक”