शरद पवार खरंच नाराज आहेत का?; उत्तर देताना अजित पवार पत्रकारांवरच भडकले, म्हणाले…

0
272

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे जयंत पाटील यांना या अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबनाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अजित पवारांवरच नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. यावरून पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता, अजित पवार, पत्रकारांवरच भडकले.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…

पवार साहेब नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं. ते नाराज असल्याचा तुम्हाला फोन आला होता का?, असा प्रतिसवाल अजित पवारांनी यावेळी केला.

‘हे धाधांत खोटं आहे. तुम्हाला हे कुणी सांगितलं? पवार साहेबांनी फोन करून सांगितलं? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मी साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही, म्हणून अशाप्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण करता, असा आरोपही अजित पवारांनी यावेळी केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कसं असावं हे मला कळतं. मी काही दुधखुळा नाही. मी 32 वर्ष राजकारण करणारा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं घेतली, राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, चर्चांना उधाण”

“कोल्हापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, उखळू ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात”

अजित पवार यांनी काढला उदय सामंत यांच्या सोबत फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here