अमरावती : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. त्यावर भाजप राजकारण करून हेतूपरस्पर ईडीच्या चौकशी लावत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल., असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असून सुद्धा एकाही भाजप नेत्यांवर ईडीची चौकशी लागत नाही. तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका- धनंजय मुंडे
महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला- सचिन सावंत
महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?- देवेंद्र फडणवीस
कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला