आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएल 2022 साठी फ्रेंचायजींनी रिटेंशन लिस्ट प्रसिद्ध केली, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. यात सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या लिस्टमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार के.एल.राहुलचं नाव नव्हतं. त्यामुळे राहुल पंजाबची साथ सोडणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.
राहुलनं स्वत: पंजाब किंग्सकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राहुलने हा निर्णय का घेतला?, राहुलने पंजाब किंग्सची साथ का सोडली? याचा खुलासा आता राहुलने केला आहे.
हे ही वाचा : “शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या थाटात साजरी”
पंजाब किंग्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं, खूप कठीण होतं. पण आपण अजून काय मिळवू शकतो? हे जाणून घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. “मी चार वर्ष पंजाब किंग्सकडून खेळलो. खूप चांगला वेळ मी घालवला. मी अजून काय-काय मिळवू शकतो. मी नवीन प्रवास सुरु करु शकतो का? निश्चित माझ्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. मी पंजाब संघा बरोबर बराच काळ होतो. मी अजून काही करु शकतो का? हे मला पहायचं होतं, म्हणून मी हा निर्णय घेतला” असं राहुल म्हणाला.
दरम्यान, यंदाच्या सीजनमध्ये राहुल लखनऊ सुपर जायंट्सच नेतृत्व करताना दिसणार आहे. लखनऊच्या टीमने मेगा ऑक्शनच्या आधीच राहुलला आपल्या ताफ्यात सामावून करून घेतलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
जनाब देवेंद्र फडणवीस जी, चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला आणि झुकला नाही का?; शिवसेनेचा सवाल
शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद