IPL चौदावा हंगामाचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ दोन संघात होणार पहिला सामना

0
285

इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगामाचे वेळापत्रक जाहीर झालं असून एप्रिल महिन्यात 9 तारखेपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

हंगामातील साखळी फेरीचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे खेळवण्यात येतील. तर अमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच प्लेऑफचे सर्व सामने खेळवले जातील.

या हंगामात साखळी फेरीत एकूण 56 सामने होतील. त्यातील सर्वाधिक 10 सामन्यांचे यजमानपद चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांना देण्यात आले आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी 8 सामने होतील.

दरम्यान, अशाप्रकारे प्रत्येक संघाला एकूण 6 ठिकाणांपैकी चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळेल. तसेच या हंगात कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. सर्व संघ तटस्थ ठिकाणांवर सामने खेळतील.

महत्वाच्या घडामोडी –

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी”

“स्लिप मास्टर रहाणे! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता अजिंक्यचा भन्नाट झेल”

मुंडे, शेख, राठोड अगदी निरागस आहेत आणि…; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here