Home महाराष्ट्र सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे

सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे

मुंबई : संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीतवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या मुलाखतीवरून शिवसेनेवर टीका करत शरद पवार यांची मुलाखत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी होती, असा दावाही केला आहे.

13 जुलै रोजीच्या मुलाखतीत म्हटलंय, सरकार तिघांचे, संवाद वाढला पाहिजे. म्हणजे संवाद नाही. सामनामधूनच उद्धव ठाकरेंवर टीका की, हे संवाद करत नाहीत. संवाद नाही, हे संजय राऊतच म्हणत आहेत. म्हणजे सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली, असं माझं म्हणणं आहे, असं नारायण राणे म्हणाले.

देश पातळीवर मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. इतके दिवस भाजपा शिवसेना नांदले ना? युती होती ना. तेव्हा कसं पटलं सगळं? आता किती दिवसांचं आहे.  देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी यशस्वीपणे काम करत आहेत. देशाचा शत्रू कोण, पाकिस्तान, चीन की, दोन्ही? हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी पाच वर्ष काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका, असंही नारायण राणेंनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल

“धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट

कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?; नितेश राणेंचा सवाल

आयुक्त बदलून पाहिले; आता पालकमंत्री बदलून पाहा- मनसेचा इशारा