मुंबई : राज्यामध्ये काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता फडणवीसांनी म्हटलं की, ‘मी दिवाळीनंतर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं. लोकांची कामं तरी होतील., असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.
हे ही वाचा : एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय; भाजप नेत्याचा टोला
पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होतं, त्याचं काय झालं? शरद पवार हे योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे. पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला देशातून हटवा, अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले
एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर करणार नव्या घरात ‘गृहप्रवेश’ !