Home क्रीडा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर

नवी दिल्ली : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या महत्त्वाच्या दौऱ्यात उपकर्णधार रोहित शर्मा व वेगवान गोलंदात इशांत शर्मा यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार पदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत असलेला कोलकाता संघाचा फिरकी गोलंदात वरूण चक्रवर्ती याला टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलं आहे. आरसीबी संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला कसोटी संघात तर कोलकाता संघाचा धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल याला एकदिवसीय संघात घेण्यात आलं आहे.

दरम्यान रोहित आणि इशांत यांना दुखापत झाल्यामुळे संघातून वगळण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच टीम इंडियाचा कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल याला वनडे संघातही स्थान देण्यात आलं आहे.

कसोटी संघ :

एकदिवसीय संघ :

टी-20 संघ :

महत्वाच्या घडामोडी-

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही- रामदास आठवले

ख्रिस गेल-मनदिप सिंगची धमाकेदार खेळी; पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सनी विजय

अजित दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये- राजेश टोपे

महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच; अशोक चव्हाणांचं विरोधकांना आव्हान