नवी दिल्ली : कोरोनापासून बरं होण्याचं देशातील रुग्णांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे, मृत्युदरही कमी आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून दिली आहे.
कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने आपल्याला अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावणे, दोन फूटांचं अंतर राखणं, सातत्यानं हात धुणं, कुठेही थुंकू नये, स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देणं हेच आपले शस्त्रं आहेत जे आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात. जर तुम्हाला मास्क लावल्यामुळे अडचण वाटत असेल तर क्षणभर त्या डॉक्टरांचं आणि नर्सेस आणि कोरोना योद्ध्यांचं स्मरणं करा, असा सल्ला मोदींनी देशवासियांना दिला आहे.
दरम्यान, कोरोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे काळजी घेणं हेच आपलं शस्त्र आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीत, तर दुसरे…; भाजपच्या ‘या’ नेत्याचे एका दगडात दोन पक्षी’
कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकट; तब्बल 640 लोकांना झाली ‘या’ विचित्र आजाराची लागण
…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे