आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दुबई : टी२० विश्वचषक 2021 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताने 20 षटकांत 7 बाद 110 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 111 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंड संघाने हे आव्हान 14.3 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
भारताने दिलेल्या 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केला, पण गप्टील 17 चेंडूत 20 धावा करुन चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला. पण यानंतर डॅरिल मिशेलने कर्णधार केन विलियम्सनबरोबर अर्धशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत उभे केले.
हे ही वाचा : ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
डॅरिल मिशेल 13 व्या षटकात 35 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर विलियम्सनने डेवॉन कॉनवेच्या साथीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. विलियम्सनने नाबाद 33 धावा केल्या. तसेच डेवॉन कॉनवे 2 धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, भारताकडून केवळ जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी –
‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
‘हे’ सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा; बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी उभे असतील तर, याहून दूर्देवी काही असू शकत नाही- नवाब मलिक