“तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय”

0
284

कॅनबेरा : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. पण ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली.

भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावत 302 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 76 चेंडूत नाबाद 92 धावा, रविंद्र जडेजाने 50 चेंडूत नाबाद 66 धावा, कर्णधार विराट कोहलीने 78 चेंडूत 63 धावा, तर मालिकेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने 39 चेंडूत 33 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरने 2, तर हेझलवूड, सीन अॅबाॅट व अॅडम झैम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 49.3 षटकात 289 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार फिंचने सर्वाधिक 82 चेंडूत 75 धावा केल्या. तर ग्लेन मैक्सवेलने 38 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी केली. तर अॅलेक्स कैरीने 42 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून  शार्दूल ठाकूरने 3, तर जसप्रित बुमरा व आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टी.नटराजनने 2 व कुलदीप यादव व रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

हार्दिक पांड्या-रविंद्र जडेजाची फटकेबाजी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य

“बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण”

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला

तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here