Home महाराष्ट्र अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर मनसेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ मुंबईत वास्तव्यात असलेल्या ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेनं बॅनरबाजी करत योगी आदित्यनाथ यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, असं मनसेकडून या बॅनरवर छापण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील

नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत- दिपक केसरकर