आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या बंडामुळे आता शिवसेनेत 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा गट उद्धव ठाकरेंचा.
तसेच पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे मुंबई महापालिकेवर सत्ता कायम राखण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र अशातच आता शिवसेनेचं बळ वाढलं आहे. कारण पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरविलं आहे.
हे ही वाचा: महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहे. उद्धव ठाकरेंसोबत आमची बैठक आहे. या भेटीदरम्यान आम्ही हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र देणार असल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
हा पक्ष आहे की चोर बाजार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मनसे-भाजप युती होणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान, म्हणाले…
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…