आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकिच्या तोंडावर सत्ता मिळवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच या दोन्ही पक्षांनी सध्या भरती सुरू केली आहे. त्यात ताजी भरती रविवारी भाजपमध्ये झाली. राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ मोहिते ऊर्फ एकनाथमामा यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्य माथाडी बोर्डाचे माजी सदस्य अनुप मोरे, पक्षाचे चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत एकनाथमामांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोरे यांच्या पुढाकाराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हे ही वाचा : शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
एकनाथमामांचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लांडेवाडी भागात प्रस्थ आहे. तर, पिंपरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. शहरातील बाकीचे दोन्ही आमदार म्हणजे जगताप व भोसरीत महेश लांडगे हे भाजपचे आहेत.
दरम्यान, आमदार नसलेल्या मतदारसंघातील एकनाथमामांच्या प्रवेशाने भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. एकनाथमामांनीही आपल्या भागात भाजपचे विचार जनमानसापर्यंत पोहचवणार असल्याचे प्रवेशानंतर सांगितले. एकनिष्ठेने पक्षकार्य करणार आहे, असं एकनाथमामा म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणूकीची उमेदवारी जाहीर”
संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब