“ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सूरूच; आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
582

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

आंबेडकरी चळवळीतील आणि युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश मालू भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधलं. मुंबईतील शिवसेना भवन येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

हे ही वाचा : …तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही गद्दारांनी शिवसेनेची साथ सोडली असली तरी दररोज अनेकांचे शिवसेनेत प्रवेश होत आहे. 40 गेले, मात्र 40 हजार लोक आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांना सांगतो की, शिवसेना आणखी मजबूत होत चालली आहे, असं ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

मोठी बातमी: चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here