नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. गोविंद बागेतली त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन बाळगणे पसंत केले. अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी या विषयावर जास्त बोलण्याचं टाळलं.

हे ही वाचा : शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे

यंदाची दिवाळी लोकांना साजरी करता यावी या विचारात आम्ही होतो. त्यामुळे काही निर्णय घेतले. लोकांनी काही सूचना केल्यात. आम्ही मास्क लावू, शिस्त पाळू पण दिवाळी साजरी करू द्या अशा सूचना केल्या. नागरिकांनी तशा सूचनाही पाळल्या. या संकटाच्या वर्षातून आपण बाहेर निघत आहोत. आपण नेहमीचा कारभार नेहमीप्रमाणे करू. गेल्या दोन वर्षात झालेलं नुकसान भरून काढू. अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आपण सावरू. नव्या ताकदीने आपण पुन्हा एकदा कामाला लागू असा विश्वास आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

…तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर

फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत- रक्षा खडसे

फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here