पुणे : जिल्ह्यात उंच असलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
वेल्हे, भोर व मुळशी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीमधून 6 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असं अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला”
दरम्यान, वेल्हे तालुक्यामध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल 1403 मीटर उंचीवर असलेला तोरणा गड सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्वाचा गड आहे. अतिदुर्गम व प्रचंड विस्तार असलेल्या तोरणा गडाचे विद्युतीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून 27 लाख 88 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. महावितरणकडून तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये उच्चदाबाच्या 11 केव्ही वाहिनीसाठी 27 वीजखांब तसेच लघुदाब वाहिनीसाठी 20 खांब उभारण्यात आले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“युझवेंद्र चहल RCB तून बाहेर; विराट कोहलीसह ‘हे’ खेळाडू संघात कायम”
ममता बॅनर्जींच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; शिवसेना-तृणमूल आघाडी होणार?