महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांच्या इतका लाचार मुख्यमंत्री झाला नाही- नारायण राणे

0
553

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील राजकारण एका स्फोटक वळणावर येऊन ठेपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आरोप केलाय. त्यानंतर संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उडी घेतली आहे. राणेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंची बिनविरोध निवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज लाजिरवाणी परस्थिती या देशात आणि महाराष्ट्रात कोणी आणली असेल तर ती सत्तारुढ मुख्यमंत्र्यांनी. महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे यांच्या इतका लाचार मुख्यमंत्री झाला नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांची सर्व कुंडली माझ्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दल शिवसैनिकांजवळ संजय राऊत काय काय बोललेला आहे हे मला माहिती आहे. तो जर माझ्या जवळ बोलला असता तर तेव्हांच मी त्याला मारला असता, असंही नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; आता किरीट सोमय्या, म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here