Home महाराष्ट्र कोरोना काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत; अजित पवार भडकले

कोरोना काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत; अजित पवार भडकले

सातारा : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असुन याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केलाय. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच संतापले.

पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, असं  म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील 18 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा जास्त आहे. आपण फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. जिथे कर्मचारी कमी आहेत, तिथे कर्मचारी दिले, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, 7 रुग्णवाहिका उद्या साताऱ्यासाठी येतील. लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांसह भाजपावाले कोमात आहेत काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल

संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल- नारायण राणे

“छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून निर्णय घेताना संभाजीराजेंनी समाजाचा विचार करावा, स्वार्थ पाहू नये”

…अन्यथा 7 जूनपासून रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार- छत्रपती संभाजीराजे