आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ संपला. यानंतर शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातीलच संजय पवार यांच्या नावावर शिवसेनेनं शिक्कामोर्तब केलं आहे. यावरून आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ आता मनसेने पुढाकार घेतलेला दिसतो आहे. राजू पाटील यांनी संभाजीराजे यांच्या बाजूने ट्विट केलं आहे.
हे ही वाचा : मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी
राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे., असं राजू पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी
…तर तुम्हांला जीवे मारून टाकू; खासदार नवनीत राणा यांना सातत्याने धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल
“शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”