नांदेड : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला.
राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो. राजकारणातल्या लोकांना अशा पद्धतीने भीती दाखवणे चुकीचं आहे. यामुळे देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ते नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार भाजपने देशात सुरू केला आहे. असं घाबरवण्याचं काम केंद्र सरकारच्या एजन्सीज करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर केला.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये”
“गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”
“सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा फडणवीसांचा दुटप्पीपणा”
…आज तेच भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत- जितेंद्र आव्हाड