मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी पटोले सपत्नीक आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पंढरपूरच्या निवडणुकी एकत्रित लढल्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. असं नाना पटोले म्हणाले आहेत. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.
हे ही वाचा- पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवारांचा संताप अनावर; म्हणाले…
देशात महागाईने पुन्हा डोके वर केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरीच्या पुढे गेले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मात्र भाजपाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. यासर्व मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. मात्र जनतेपासून काहीच लपलेले नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होणार, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नाैटंकी सुरू आहे; शिवेंद्रराजेंचा टोला