आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : नांदेड देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय होईल, असा दावा काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
हे ही वाचा : नवाब मलिक सारख्या लोकांना मी माझ्या खिशात ठेवतो; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे चांगल्या प्रकारे जुळवल्यामुळे काँग्रेस पक्ष ही जागा निश्चितपणे जिंकेल, असा आत्मविश्वास बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. ते सांगोलामध्ये माध्यमांशी बोलत होते.
देगलूर मतदारसंघ काँग्रेसच्या विचारांना मानणारा आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर येथील आमदार होते. अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. मात्र, देगलूर-बिलोली येथून त्यांचा मुलगा उमेदवारी करत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका
राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान
“शेतकऱ्यांना अल्प मदत; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते करणार आंदोलन”