Home महाराष्ट्र ‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका

‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अहमदनगरमध्ये एसटी चालकाने गळा आवळून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर मालेगावात एसटी चालकाच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. ते मुंबईत बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान

“सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन आहे. 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. अशातच कामावर आले नाही तर कारवाई करू, असे एसटीच्या एमडीने पत्रक काढले आहे. हे जुलमी पत्रक असून एमडीच्या कार्यालयाला टाळे लावू. अशा वेळी मी स्वत: उपस्थित असेन.” असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करण्याचा अजब आदेश साखर आयुक्तांनी काढला आहे. आयुक्तांच्या या आदेशावर दरेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. साखर आयुक्तांनी जे पत्रक काढले ते अन्यायकारक आहे. अशा जुलमी पद्धतीने वसुली करू नये. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारू, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“शेतकऱ्यांना अल्प मदत; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते करणार आंदोलन”

निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; नारायण राणेंनी प्रचारासाठी कसली कंबर

मनसेत प्रवेशाचा धडाका; चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश