कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की- संजय राऊत

0
213

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेंव्हा संजय राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असंही संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“चित्राताई ठेचतील या भितीनं नागोबा बाहेर आला”

“जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

“जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here