“दोन मिनिटाच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

0
205

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं. संजय राठोड यांनी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळल्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

संजय राठोड यांना वर्षा निवासस्थानमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत रहावं लागलं होतं. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी 2-3 मिनिटे चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली. बहुधा त्यांनी कानात सांगितलं असावं. मी तुला उध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान, संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्थ होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत हे सुद्धा वर्षा बंगल्यावर आले होते. मात्र, संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का?, याबाबत अजूनतरी काही माहिती मिळाली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

…अन् संभाजी भिडेंनी चक्क शिवसेना आमदारालाच काढायला लावला मास्क

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे- देवेंद्र फडणवीस

तृप्ती देसाईंच संजय राठोड यांना खुलं पत्र; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here