मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

0
183

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड :  गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? असं प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना “मी भाजपात अस्वस्थ नाही. मी सध्या सामान्यपणेच अस्वस्थ आहे. कारण माझ्या परिस्थितीत इतर कुणालाही ठेवलं तर तो माणूस अस्वस्थ होईलच किंवा तो आणखी काय करेल? हे माहीत नाही. पण मी कणखरपणे उभी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न

दरम्यान, मी अस्वस्थ असताना कोणाताही निर्णय घेत नाही. मी फार जड आत्मा आहे. मी पटकन डगमगणारी नाही. मी अस्वस्थ आहे, कारण एकाचवेळी मी खूप गोष्टींकडे लक्ष देत आहे. अगदी घरापासून व्यावसायिक गोष्टी, राजकारणाकडे लक्ष देत आहे. मी ‘वन मॅन आर्मी’ आहे, म्हणून मी अस्वस्थ आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडे ही भाजपची लेक नाही का? ; सुप्रिया सुळे यांचा भाजपाला परखड सवाल

 आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे

महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here