राहुल गांधी हे सक्षम, संयमी आणि संवेदनशील नेते; त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं- अशोक चव्हाण

0
181

मुंबई : काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्याला अध्यक्ष पद द्यावं अशी भूमिका सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घेतली आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.

अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारवं या निवेदनाचं एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. खा. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत, अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“मी पद सोडायला तयार, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा”

… या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत

तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाला प्रार्थना

“विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात 1 लाख वारकरी आंदोलन करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here