पुणे : भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आगे. ते पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र प्रेदश अधिवेशनात बोलत होते.
भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय हे म्हणावंच लागेल, असं म्हणणारेच देशात राहू शकतील. देशात सध्या एनआरसी, सीसीए आणि लोकसंख्या सूचीवरून रणकंदन माजलं आहे, असं प्रधान म्हणाले.
एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून प्रधान यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. “देशाचे तुकडे करण्याची योजना आखलेल्यांचे अनुयायी आजही विरोध करत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकजणांनी बलिदान दिलं. मात्र आता स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या, नागरिकता कायदा याच्यावर चर्चा होत आहे. देश धर्मशाळा बनवतोय जो येईल तो राहील, असं होणार नाही”, असंही प्रधान यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
-उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री- नारायण राणे
-ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल
-अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त; ठाकरे अडनाव वरती टीका करावी इतकी त्यांची उंची नाही- रुपाली चाकणकर
-रोहित पवारांना मंत्रिपद द्या; पक्षातील तरुणांचं शरद पवारांना पत्र